Bhiwandi Manja Accident : पंतगीच्या मांजाने घात केला; तरुणाचा गळा चिरला, प्रकृती गंभीर

 

Bhiwandi : भिवंडीत पंतगीच्या मांजामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. पंतगीच्या मांजामुळे २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा गळा कापला गेला आहे. आठवडाभरात ही दुसरी घटना घडली आहे. मांजामुळे झालेल्या या अपघाताच्या घटनेने भिवंडीकरांमध्ये खळबळ उडाली आहे.

भिवंडीमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर पतंगीच्या मांजामुळे अपघात झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. 24 वर्षीय मसूद खान हा तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. मसूद आपल्या कामावरून दुचाकीवर घरी जात असताना गळ्यात मांजा अडकला. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला.

या अपघातात मांजामुळे त्याचा गळा कापला गेला आहे. नागरिकांनी तत्काळ त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे मसूदला पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची स्थिती चिंताजनक आहे.

Pune : प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन

पतंगीच्या मांजामुळे वारंवार अपघात घडत आहे. गेल्या आठवड्यात याच उड्डाणपुलावर पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्यामुळे एक तरुण जखमी झाला होता. मागील वर्षी देखील अशाच प्रकारच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. प्रशासनाकडून या घटनेवर उपाययोजना करण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पोलिसांनी पतंगीचा मांजा गोळा केला आहे. उड्डाणपुलाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर उपाययोजना केल्या नाहीत. तर अशा प्रकारच्या घटनांमुळे आणखी बळी जाण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागात सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही नायलॉन मांजामुळे एक तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. या तरुणाचा गळा मांजाने कापला. या अपघातात तरुणाला ७५ टक्के पडले आहेत. त्यामुळे या नायलॉन मांजा किती घातक आहे, याची प्रचिती येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply