Bhayandar Building Collapse: मीरा भाईंदरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Bhayandar Building Collapse : मीरा भाईंदर परिसरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. भाईंदर परिसरात तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत परिसरातील काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच बचावपथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. इमारत परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी दरड तसेच इमारत कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. अशातच भाईंदर स्टेशन पूर्व समोरील तीन मजली इमारतीचा समोरील भाग कोसळला.

या दुर्घटनेत स्थानिक नागरिक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.  मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे.

Pune : कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

विशेष बाब म्हणजे मुंबई शहरात 35, पश्चिम उपनगरात 126 आणि पूर्व उपनगरात 65 इमारती अशा 224 इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिली होती.

यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊन स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने या इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून इमारत रिकामी करण्याची कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

मात्र, या 226 इमारतींपैकी 104 इमारतींमधील रहिवाशांनी इमारत रिकामी न करण्याबाबत न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवले आहेत. त्यामुळे मुंबईत धोकादायक इमारती कोसळण्याचा घटना वाढू शकतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply