Bharat Ratna : ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर; PM मोदींची घोषणा

Bharat Ratna : सर्वात मोठी बातमी. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरुन अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फोन करुन अभिनंदनही केले. या घोषणेनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

US Strikes : अमेरिकेने घेतला जॉर्डन हल्ल्याचा बदला, सीरिया-इराकमधील दहशतवादी तळांवर हल्ला; अनेकांना मारल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट..

"श्री लालकृष्ण अडवाणी  यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.

तसेच "तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांनी स्वतःला आमचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून ओळखले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत," अशा भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्यात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply