Bhandup slab collapse : भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Bhandup slab collapse: भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी ९.४२ वाजता घडली. इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडल्याचे कळतंय.

प्राथमिक माहितीनुसार, ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली. स्लॅबचा काही भाग आगांवर कोसळल्याने राजकुमार धोत्रे वय 19 वर्षे आणि रामानंद यादव वय 18 वर्षे हे दोन तरूण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *