Bhandara : भंडाऱ्यातील तुमसरमध्ये हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद कारचालकाने सायकलस्वार मजुरांना उडवलं

Bhandara : भंडाऱ्यातील देव्हाडी-तुमसर राज्य महामार्गावर शुक्रवारी एक भयानक घटना घडली. एका मद्यधुंद कारचालकाने सायकलवरून घरी निघालेल्या २ मजुरांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की सायकलस्वार १० ते १५ फूट दूर जाऊन कोसळले. सुदैवाने या घटनेत दोघांचाही जीव वाचला. मात्र, अपघातात एका मजुराला गंभीर दुखापत झाली आहे.

त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर कारचालक हा फरार झाला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मनोज परसगडे (४०) रा. माकडे नगर तुमसर असे अपघातातील जखमी मजुराचे नाव आहे.

Nashik : नाशिकमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त, बडी दर्गा, दूध बाजार परिसरात जमावबंदी; परिसरात तणावपूर्व शांतता

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा देव्हाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो. सायंकाळी तुमसर येथे घरी जाण्याकरिता मनोज व त्याच्या एक मित्र सायकलने निघाले. देव्हाडी तुमसर या राज्य महामार्गावरील मोर केमिकल जवळ एका भरधाव स्विफ्ट कारने मनोज याच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.

कारची धडक बसताच मनोज हा पुलाच्या कठड्याला जाऊन धडकला. तर त्याच्या दुसरा मित्र बाजूला फेकला गेला. कठडा व कारचे लोखंडी भाग मनोजच्या डोक्याला व डाव्या पायाला लागले, त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालक विनोबा भावे हा बायपास रस्त्याने पसार झाला.

पाठीमागून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी जखमी मनोजला रस्त्याच्या बाजूला केले. या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना भ्रमणध्वनीवर देण्यात आली. पोलिसांच्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरीता नेण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मनोजला भंडारा येथे रेफर केले. दरम्यान, कारचालक हा मद्यपान करून गाडी चालवत होता. मनोजला धडक देण्यापूर्वी त्याने शाळेतून कर्तव्य बजावून परत येणाऱ्या शिक्षकाला कारने कट मारली. सुदैवाने ते शिक्षकही थोडक्यात बचावले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply