Bhandara News : भंडारा जिल्हा बालविवाह रोखण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर

Bhandara News : बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहाच्या प्रतिबंधासाठी शासनाने कायदा केला आहे. परंतू तरीही ग्रामीण व दुर्गम भागात बालविवाह केले जातात. बालविवाह करणाऱ्यांवर व सहभागी असलेल्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.अश्यातच भंडारा जिल्ह्यात 1 एप्रिल ते 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीपर्यंत जिल्ह्यात 10 बाल विवाहाचे प्रकरण हाताळले आहेत. यामध्ये 3 प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून ते आता न्यायलयीन प्रविष्ट आहेत.

वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. मात्र काही मुलींचा विवाह 18 वे वर्ष सुरू असतानाच केला जातो. याबाबद्दल तक्रार होत नसल्याने हे विवाह बिनधास्त पार पडतात. बालविवाहामुळे अल्पवयीन अवेळी जबाबदारी येऊन पडते याचा मोठा आघात त्यांच्या मनावर पडते त्यामुळे शासनाने मुलगा व मुलीचे किमान वय निश्चित करून दिले आहेत.तरी बालविवाह पार पाडले जातात.

Rashmi Shukla : जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला

अशातच भंडारा जिल्हा बालविवाह प्रतिबंध करण्यास महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यात 1 एप्रिल ते 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीपर्यंत 10 बाल विवाहाचे प्रकरणे हाताळली आहेत. यामध्ये 3 प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून ते आता न्यायलयीन प्रविष्ट आहेत. तर NHFS च्या आकडेवारी नुसार 1.5 टक्के रेसो असून भंडारा जिल्हा हा बाल विवाह प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात संसार कसा करू बाबा ? अशी 18 वर्ष खालील मुलं-मुलींची मनोभावना असली तरी आताही सुद्धा दुर्गम आणि ग्रामीण भागात बालविवाह लावून दिले जातात मात्र यासर्व बाबीकडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड हेल्पलाईनची करडी नजर असल्याचे दिसून येत असल्याने त्यामुळे भंडारा जिल्हा हा आता महाराष्ट्रामध्ये बाल विवाह प्रतिबंध करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर पोहचलेला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply