Bhandara News : भंडाऱ्यात १४ किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Bhandara News : भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने छुप्या पद्धतीने नेला जात असलेला १४ किलो वजन असलेला दीड लाखाचा गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या प्रकरणी  पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई भंडारा शहरात रात्रीच्या सुमारास करण्यात आली. 

गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. कारधाहून भंडाराकडे येत असलेल्या वाहनाला थांबविण्यात आले. यात चौकशी केली असता फिरोज व मोहम्मद हे दोघेही ओडिसा राज्यातून गांजा प्लास्टीकच्या बोरीतून आणत असल्याचे आढळले. यात प्लास्टीकच्या बोरीमधून तब्बल १४ किलो ४८८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख ४४ हजार ८८० रुपये सांगण्यात येत आहे. याशिवाय त्याच्या ताब्यात असलेला ट्रक, ४३३ भाजीचे कॅरेट व दोन मोबाइल जप्त करण्यात आले.

Krishna Janmabhoomi : कृष्णजन्मभूमीतील मंदिर औरंगजेबाने पाडले होते, मथुरेवर एएसआयचा मोठा खुलासा

स्थानिक गुन्हे शाखेने  केलेल्या कारवाईत दीड लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई रात्रीच्या सुमारास भंडारा शहरातील सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरात करण्यात आली. यात दोन इसमांना अटक करण्यात आली आहे. फिरोज अहमद नबी रसुल (वय ४२), मोहम्मद शाहरुख मोहम्मद सलीम (वय २६, दोन्ही राहणार कुंभारपारा संबलपूर, ओडिसा) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्याची किंमत १३ लाख ७७ हजार ५३० रुपये सांगण्यात येते. भंडारा पोलिसांनी दोघांविरुद्ध एनडीपीएस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार मोहरकर करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply