Bhandara News : कंटेनरमधून ४० गोवंशाची सुटका; जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा सक्रिय, साकोली पोलीसांची कारवाई

Bhandara News : कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी शहरातील लाखांदूर फाट्यावर कत्तलखान्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांनी अडवून कंटेनरमध्ये निर्दयीपणे भरलेल्या ४० गोवंशाची सुटका केली. ही कारवाई साकोली  पोलिसांनी केली आहे.

अवैध धंदे करणारे तस्कर वेगवेगळी शक्कल लढवून तस्करी करीत आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा या तस्करीवर आळा घालण्यासाठी सतर्क आहे. या दरम्यान भंडारा जिल्ह्यात गोवंश तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मागील काळात यशस्वी प्रयत्न केले आहे. मात्र काही जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा नवनवीन पद्धत वापरून गोवंश तस्करीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर कंटेनरमधून निर्दयीपणे कोंबून ४० गोवंशांना कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी शहरातील लाखांदूर फाट्यावर कत्तलखान्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांनी अडवून कंटेनरमध्ये निर्दयीपणे भरलेल्या ४० गोवंशाची सुटका केली. 

Shivsena MLA Disqualification : ''मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा अन् पंतप्रधानांचा रोड शो..'' संजय राऊतांनी निकालाआधीच लावला तर्क

तीन जणांवर गुन्हा दाखल 

सदरची कारवाई साकोली पोलिसांनी केली असून ११ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनर मालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये कंटेनर मालक निजामुद्दीन नजीरुद्दीन (वय ४५, रा. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर), चालक अब्दुल राजिक अब्दुल खालिक (वय ३०) आणि शेख नशीर शेख याशीन (वय ३५) यांचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply