Bhandara : ओव्हरटेक न जमल्याने संताप; एसटी भररस्त्यात अडवून कारचालकाचा धिंगाणा, VIDEO व्हायरल

Bhandara : राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्वतःची चूक असतानाही, एका कार चालकाने एसटी महामंडळाच्या बसला अडवून महामार्गावरच धिंगाणा घातला. सदर घटना भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात घडली. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससमोर कार आडवी घालून झालेल्या या वादामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती, तर प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बस नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होती. दरम्यान, भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात एका कार चालकाने चुकीच्या साईडने बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात कार चालकाची स्वतःची चूक असतानाही, त्याने एसटी बस थांबवून चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

कार चालकाच्या या उद्दामपणामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या रांगा लागल्या.वाद बराच वेळ चालल्यानंतर एसटी चालकाने प्रसंगावधान राखत वादग्रस्त बस थेट भंडारा पोलीस ठाण्यात नेली आणि कार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

या प्रकारामुळे बसमधील प्रवासी ताटकळले होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *