Online Fraud : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये २६ लाखांची फसवणूक; भंडारा पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

Bhandara : शेअर मार्केट ऑनलाइन ऑप्शन ट्रेडिंगच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणात ज्या लोकांची फसवणूक झाली, अशा लोकांनी गुंतवणूक केलेल्या पैशाच्या पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, भंडारा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. बऱ्याचदा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली जात असते. अशाच प्रकारे भंडारा जिल्ह्यात दोघांनी अनेकांशी संपर्क साधत शेअर मार्केट ऑनलाइन ऑप्शन ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती. यात साधारण २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले होते. याबाबत पोलिसात तक्रारी दाखल होत्या.

Pune Crime : पुण्यात रक्षकच झाला भक्षक! ड्युटीवर असणाऱ्या पोलिसानं ५ वर्षांच्या चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

सुरवातीला दिला व्याजदर

शेअर मार्केट ऑनलाइन ऑप्शन ट्रेडिंगचे नावाखाली आरोपी मोहीत मोहन पाखमोडे (सेलोटी, ता. लाखनी) याने भंडारा शहरातील व तालुक्यातील लोकांना गुंतविलेल्या रकमेवर प्रती महिना ५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखविले. याकरिता त्याने रोख, यूपीआय व बँक खात्याच्या माध्यमातून स्वतःच्या बँक खात्यावर पैसे जमा करून घेतले. सुरुवातीला त्याने नेमून दिलेल्या व्याजदरा प्रमाणे पैसे दिले.

दोघांना घेतले ताब्यात

मात्र लोकांना पूर्ण विश्वास बसल्याने सुरवातीला व्याज दिल्यानंतर व्याज किंवा त्यांची मुद्दल परत न करता एकूण २६ लाख ७ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. याबाबत दाखल तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. भंडारा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कसोधन करीत आहेत. आरोपी मोहित पाखमोडे याला अटक करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply