Bhandara Crime : बीडीसीसी बँक दरोड्याच्या प्रयत्नातील चारजण ताब्यात; वीस दिवसांनंतर पोलिसांना यश

 

Bhandara : मागील पंधरवड्यापूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भंडारा जिल्हा बँकेच्या समोरील दाराचे कुलूप तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बँकेतील तिजोरी न तुटल्याने रक्कम सुरक्षित राहिली होती. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा तपास सुरु असताना वीस दिवसांनंतर संशयितांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. यात पोलिसांनी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.

 

भंडारा जिल्हा बँकेत ४ डिसेंबरच्या रात्री चोरीचा प्रयत्न झाला होता. बँकेतील कर्मचारी ४ डिसेंबरच्या सायंकाळी नियमित वेळेनुसार बँक कुलूपबंद करून घरी गेले होते. तर बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी बँक परिसरात एटीएममध्ये कार्यरत होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचा वीजपुरवठा बंद करून समोरील कुलूप तोडून प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला.

 

तिजोरी न फुटल्याने सीसीटीव्हीच्या डीव्हीआर घेऊन फरार

बँकेची रक्कम ठेवलेल्या तिजोरीतून रक्कम चोरण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिजोरी न तुटल्याने त्यातील रक्कम सुरक्षित राहिली. मात्र चोरट्यानी खाली हात न जाता त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर व मॉनिटर घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी बँकेकड्न पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरु होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply