Bhagwan Pawar : नियमबाह्य कामे करायला नकार दिल्यामुळं माझं निलंबन; आरोग्य अधिकाऱ्याचं CM शिंदेंना खळबळजनक पत्र

Bhagwan Pawar : पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात नक्की आहे तरी काय? मंत्री महोदयांनी कात्रजच्या कार्यालयात मला बोलावलं. नियमबाह्य टेंडरची काम करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. नियमबाह्य काम केले नाही म्हणून निलंबन केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी नाव न घेता आरोग्यमंत्र्यांची  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने अनेकदा आरोग्य मंत्र्यांविरोधात आरोप केले होते. परंतु आता स्वत: निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेणार का, संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Car Stunt In Kalyan : धक्कादायक! धावत्या कारवर बसून तरुणाची स्टंटबाजी, अल्पवयीन मुलगा चालवता होता गाडी; पोलिसांकडून कारवाई

नियमबाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असं भगवान पवार यांनी पत्रात म्हटलंय. आरोग्यमंत्र्यांची नियमबाह्य काम करण्यात दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मॅटमध्ये दावा दाखल केला, हा आकस मनात ठेवून त्यांनी मानसिक छळ केला असंही भगवान पवार पत्रात  म्हटलं आहेत.

आता निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. एका मंत्र्यांकडून नियमबाह्य कामांसाठी दबाब टाकला गेला असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात या पत्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. आता  या पत्रानंतर भगवान पवार यांनी आरोप केलेले मंत्री कोण? अशी चर्चा समोर येत आहे. या पत्रातून त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती देखील केलेली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply