Bengaluru News : महिलेला फरपटत नेत मंदिराबाहेर काढलं; पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Bengaluru News : देव आणि मंदिर हे कोणत्या एका व्यक्तीचे नाही. देव प्रत्येकालाच समान न्याय देतो असं म्हटलं जातं. अशात एका मंदिरात पुजाऱ्याने महिलेबरोबर वाईट कृत्य केले आहे. महिलेचे केस धरत तिला मंदिरातून खेचून बाहेर काढले. तसेच त्या परिसरातून हाकलवून दिले. पीडितेने घटनेविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बंगळुरूमधील वेंकटेश मंदिरात ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेत महिला पुजाऱ्याच्या अंगावर थुंकली होती त्यामुळे तिला बाहेर काढण्यात आले, असे म्हटले जात आहे. सदर महिला २१ डिसेंबर रोजी वेंकटेश मंदिरात आली होती. त्यानंतर तिने वेंकटेश  मूर्ती शेजारी बसण्याचा हट्ट केला. ती स्वत:ला वेंकटेश यांची पत्नी असल्याचे सांगत होती. त्यामुळे पुजाऱ्यांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती पुजाऱ्यांच्या अंगावर थुंकली. त्यामुळे पुजाऱ्याला असे पाऊल उचलावे लागले असे म्हटले जात आहे. महिला मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण माहित नसताना व्हिडिओ पाहिल्यावर अनेक नेटकरी पुजाऱ्यावर संताप व्यक्त करत आहेत. यात पुजारीने महि लेला आधी डोक्यात मारलेलं दिसतं आहे. त्यानंतर तिच्या केसांनाधरून बाहेर काढत असताना ती खाली पडते असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. असे असले तरी पोलिसांनी आता महिलेच्या तक्रारीनुसार पुजारी आणि तेथील इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply