Bengaluru Blast : बेंगळुरू कॅफे स्फोटाचं पुणे कनेक्शन? संशयित दहशतवादी शहरात, तपास यंत्रणा अलर्टवर

Bengaluru Blast : बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटाचतील संशयित दहशतवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेला आहे. बेंगळुरूमधून बल्लारी आणि तेथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत १ मार्च रोजी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह दहा लोक जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला  आहे.

Sindhudurg News : नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत

दशहतवादी पुण्यात आल्याचा संशय

या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतलं गेलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क, टोपी आणि चष्मा घातलेला एक संशयित दहशतवादी कॅफेत प्रवेश करताना आढळून आला  होता. स्फोटकांनी भरलेली पिशवी कॅफेत ठेवून तो तेथून पसार झाला, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आलं आहे.

स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी उपकरण वापरण्यात आलं होतं. स्फोटानंतर संशयित दहशतवादी बेंगळुरूमधून बसने पसार झाला. तो बल्लारी बसस्थानकात उतरला. बल्लारी स्थानकातून तो दुसऱ्या बसने गोकर्णपर्यंत गेला. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

१० लाखांचं बक्षीस जाहीर

मात्र, तो नक्की पुण्यात आला की दुसऱ्या ठिकाणी गेला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती तपास यंत्रणांनी‘एनआयए’च्या (NIA) पुणे आणि मुंबईतील पथकांना दिली आहे.

बेंगळूर आणि बल्लारी बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. भटकळ आणि गोकर्ण बसस्थानकातील चित्रीकरणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास एनआयएने १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply