Bees Attack School Children: शाळकरी मुलांवर मधमाशांचा हल्ला, ४० जण जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

Bees Attack School Children : गेल्या काही दिवसांपासून मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. आग्राजवळील उर्जितम आर्यन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नरहौली येथे काल (सोमवारी) सकाळी आठच्या सुमारास मधमाशांनी शाळकरी मुलांवर हल्ला केला. मधमाशांनी मुख्याध्यापकांसह 40 मुले जखमी झाले आहेत. सहा मुलांना सीएचसीमधून रुग्णवाहिकेतून आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळा नुकतीच उघडली असताना शाळेबाहेरील मधमाशांचे झाडावरील पोळे फुटले आणि मधमाशांनी अचानक हल्ला केला. मुलं सैरावैरा धावत सुटली. शैक्षणिक कर्मचाऱ्यांना स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक मुले घराकडे धावत सुटली.

Uddhav Thackeray : सूरतेत एक जादू झाली अन् त्यांचा उमेदवार बिनविरोध आला; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

प्राचार्या मंजुरानी त्यागी यांनी सांगितले की, शाळेत सुमारे 40 मुले होती. मधमाशांच्या दंशामुळे जखमी झालेल्या मुलांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळेतील मुलांना घरी सोडून देण्यात आले.

सीएचसी बाहचे अधीक्षक डॉ. जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 6 मुलांना प्राथमिक उपचारानंतर एसएन मेडिकल कॉलेज, आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply