Beed News : हृदयद्रावक! वृद्ध पत्नी कापूस वेचायला गेली, घरात अनर्थ घडला; झोपलेल्या अंध पतीचा आगीत होरपळून मृत्यू

Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील आलापुर येथे पत्र्याच्या शेड असलेल्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत  घरामध्ये असलेल्या एका अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची  दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा अंध वृद्धाची पत्नी कापूस वेचणीच्या कामासाठी शेतात गेली होती.  

बीडच्या आलापुर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात पत्री शेड असलेल्या घरामध्ये राहत होते. दरम्यान आज सकाळी रुक्‍मीणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेले. यामध्ये रामभाऊ शहाणे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Amol Kolhe : माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा; अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

ग्रामस्थांचे प्रयत्न वाचवू नाही शकले प्राण
आग लागल्याची माहिती मिळताच गावकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अंध असलेल्या रामभाऊ यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेडच्या बाहेर येता आलं नाही. त्यामुळे आग विझवण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी शेडमध्ये मृत्यू झाला. दरम्यान यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply