Beed News : मनोज जरांगेंच्या सभेपूर्वीच बीडमध्ये ५० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; चिठ्ठीतून केली आरक्षणाची मागणी

Beed News : मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, या सभेआधीच बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

मराठा आरक्षणाची   मागणी करीत एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. मधुकर खंडेराव शिंगण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Sunil Keadar : सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा; 10 लाखांचा दंड!

मयत मधुकर शिंगण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये "मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  साहेब, राम राम... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं, त्याचबरोबर शिंगण कुटुंबियांना सरकारी मदत जाहीर करावी, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी एका २४ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना धाराशिवमधील भूम तालुक्यात घडली आहे. अमरनाथ भाऊसाहेब कदम असं मृत तरुणाचं नाव असून तो गिरवली गावातील रहिवासी आहे. अमरनाथ हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply