Beed News : दुध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून बीड- परळी महामार्ग अडवला

Beed News : दुधाचे भाव घसरल्याने बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. दूध दरवाढीच्या मागणीसह अन्य काही मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बीड- परळी महामार्गावर रस्ता रोको केला असून शेतकऱ्यांनी रस्त्यावर  दूध ओतून निषेध व्यक्त केला आहे.

 परळी महामार्गावरील जरूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी दुधाला ५० रुपये हमीभाव मिळावा, यासह अन्य मागण्यासाठी बीडच्या जरूर फाटा येथे शेतकरी नेते सुधीर काकडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्यावर दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

Ravindra Dhangekar : हातात स्टेथोस्कोपचा, अंगावर एप्रन; आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

या आहेत मागण्या 

पशु खाद्याच्या किमंती ५० टक्केपेक्षा कमी कराव्यात. पशु औषधे जीएसटीतुन मुक्त करावे. प्रत्येक गावात आद्यावत पशु वैद्यकीय प्रयोगाशाळा व पशु वैद्यकीय दावाखाना आसावा. शेतकरी हिस्त्र प्राण्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाऊन शेतीला पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे लाईट ही दिवसाची करावी. बीड तालुक्यातील बहुतांश गावात पाणी व चाऱ्याची समस्या निमार्ण झाली आहे. तरी दावणीला चारा व पाणी देण्यासाठी निर्णय घ्यावा.

गोंदियात अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला

गोंदिया :  गोंदिया जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. पण, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धान पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. तर आता पुन्हा अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावल्याने धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा हैराण झाल्याचे चित्र गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply