Beed News : बीडमधील जाळपोळ, दगडफेक प्रकरण; प्रमुख आरोपीसह २६२ जण ताब्यात

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जणांना ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.. तर जवळपास ३०० आरोपींची ओळख पटली असून यामध्ये आणखी चार प्रमुख आरोपी आहेत. 

Uddhav Thackeray : जी कारवाई नारायण राणेंवर केली, तशीच कारवाई उद्धव ठाकरेंवर करणार? शिंदे सरकारने CD मागवली

मराठा आरक्षण  मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर दगडफेक व जाळपोड करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरवात केली होती. यात आतापर्यंत २ हजार जणांची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे जे फरार आरोपी होते आणि ज्यांना आता अटक केली आहे. अशांना कोणी मदत केली आहे? याची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

आरोपींना पकडण्यासाठी १२ पथक 

दगडफेक व जाळपोड करण्यामध्ये दहा टोळ्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यात २६३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश आहे. तर ३०० जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे. या ओळख पटेलल्या आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके काम करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply