Beed News : अजितदादा समर्थक नवरा, भाजप समर्थक बायको, सासूला BRS मधून तिकीट, सगळे एकत्र आले, बीडमध्ये गुलाल उधळला!

Beed News : ग्राम पंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक निकाल लागत आहेत. बड्या बड्या नेत्यांचा धक्के बसत असताना, तिकडे बीडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  यांच्या भारत राष्ट्र समिती  अर्थात बीआरएसने खातं उघडलं. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून बीआरएसने महाराष्ट्रात पहिली एन्ट्री घेतली. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीत  बीआरएसने सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या. शशिकला भगवान मस्के  या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या.

गेवराईत बीआरएस कसं जिंकलं?

बीड मध्ये गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायत बीआरएसकडे आली.शशिकला भगवान मस्के यांनी गुलाल उधळत,सरपंचपदाची माळ मिळवली. मूळचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब म्हस्के हे राष्ट्रवादीत होते. त्यांची पत्नी मयूरी खेडकर मस्के या भाजपमध्ये होत्या. मात्र दोघांनी काही महिन्यांपूर्वीच एकत्र येत,तिसरा पर्याय BRS चा निवडला. 

Delhi Pollution : दिल्लीत सम-विषम नियम लागू, बांधकामं बंद, शाळा आणि कार्यालयांसाठी नवे नियम

आतापर्यंत विकास नव्हता, प्रस्थापितांची दडपशाही, दबाव पाहून आम्ही बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं मयूरी मस्के यांनी एबीपी माझाला सांगितलं. गाव तिथे शिबीर घेत नियोजन केलं. विधानसभेच्या सर्व गावांमध्ये पोहोचलो. त्यानंतर मयूरी यांच्या सासूबाई शशिकला मस्के यांना सरपंचपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय बीआरएसने घेतला. आम्ही "सासूबाईंना निवडणुकीत उभं करण्याबाबत गावात सभा घेऊन विचारणा केली. गावकऱ्यांनी होकार दिला आणि निवडणुकीचा निकाल समोर आला" असं मयूरी यांनी सांगितलं. 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply