Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाला मागितली एक लाख रुपयांची खंडणी

 

Beed Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणामुळे बीडमधील कायदा व्यवस्था चर्चेचा विषय असताना शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. विकास कामासाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. ममदापूर-पाटोदा गावातील तिघांनी महिला सरपंचाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?

नेमकं काय घडलं?

अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात विकास कामे सुरू असताना, हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते. यादरम्यानच १६ ऑगस्ट २०२४ रोजी वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली. याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात शाळा दुरुस्तीच्या कामासाठी चार लाख रूपये आले आहेत. गावातील शाळेचं काम सुरू करण्यात आलेय. पण त्याचवेळी गावातील वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी वारंवार अडथळा निर्माण केला. त्याशिवाय चार लाखांपैकी एक लाख रूपयांची सरपंच मंगल राम मामडगे यांच्याकडे मागणी केली. या प्रकरणी सरपंच मामडगे यांनी फिर्याद दिल्यानंतर माजी सरपंच, एक सदस्य व उपसरपंचाचे पती या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ममदापूर पाटोदा या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच या महिला आहेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply