Beed News : बीड जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

Beed News : बीड जिल्ह्यात येत्या १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ यांनी हे आदेश जारी केले आहे. येत्या ४ जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवार २ जून २०२४ रोजी मध्यरात्रीपासून या मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १५ जून मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन नये. तसेच मिरवणुका, मोर्चे तसेच उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून 80 लाखांची फसवणूक, दाेघांना अटक

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही शस्त्र, सोटे, काठी तसेच शरीराला इजा होणाऱ्या बाळगू नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही सोशल मीडियावर शेअर करू नये तसेच ती जवळ बाळगू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

नागरिकांनी जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, यासारखी कृत्ये टाळावी. जेणेकरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply