Beed News : बाजार तळावरील अतिक्रमणाच्या विरोधात नागरिकांचे अन्नत्याग आंदोलन

Beed News : बीडच्या बाजार तळावरील अतिक्रमणाच्या विरोधात बीडच्या दिंद्रुड गावातील नागरिक आक्रमक झालेआहेत. बेकायदेशीर बाजार तळ्याच्या जमिनीचा फेरफार रद्द करण्याची मागणी करत बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केले आहे. याबाबत अनेकदा मागणी करून देखील याबाबत कारवाई झाली नाही. यामुळे नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे.

बीडच्या दिंद्रुड गावात निजाम कालीन आठवडे बाजार भरतो. त्या बाजार तळाच्या जागेवर एका समाजाने दफनभूमी बनवल्यामुळे आठवडी बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे दिंद्रुड ग्रामस्थांनी एकत्र येत बाजार तळाच्या जागेवरील बेकायदेशीररित्या केलेला फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाकडून कोणतीही दाखल नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

Ravikant Tupkar : शेगावसह बुलढाणा जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनविणार : रविकांत तुपकर

गावातील सर्व दुकाने बंद ठेवत निषेध 

दिंद्रुड गावातील नागरिकांनी अन्नत्याग व इच्छा मरण उपोषण सुरू केले आहे. तसेच गावातील सर्व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. तसेच यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी देखील केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply