Beed News : धनंजय मुंडे यांच्या होम पीचवर शरद पवारांची सभा, बीडमध्ये राजकारण तापलं...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा बीडमध्ये होत आहे. धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर होणाऱ्या पवारांच्या सभेआधी बीडमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बीडमध्ये होणाऱ्या उद्याच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित दादा पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील सभेनंतर आता दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या होम पिचवर होत आहे. ही सभा महत्त्वपूर्ण मनाली जात आहे.

या सभेमधून नेमकं राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय? याची उकल देखील होणार आहे. या सभेच्या आधीच बीड जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. यात शरद पवार गट उत्साहात दिसून येत आहे. तर दुसरीकडे अजित दादा गटाने मात्र बॅनर वार सुरू केली आहे. या सभेच्या अनुषंगाने सामान्यांच्या प्रतिक्रिया तिखट आहेत. 

New Delhi : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 100 शहरांमध्ये धावणार 10 हजार इलेक्ट्रिक बस; केंद्र देणार निधी

या सभेच्या अनुषंगाने तयारी पुर्ण झाली आहे. सभेसाठी दिलेला पेंडॉल कमी पडेल. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हिसभा घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेनंतर बीडमध्ये 27 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तर सभा पार पडणार आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत शरद पवार काय बोलणार आणि अजित पवार त्याला उत्तर काय देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उत्तर सभेचे आयोजन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply