Beed News : मराठा आंदोलनाचा लालपरीला धसका; बीडहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या बसेस बंद, प्रवाशांचा खोळंबा

Beed News : आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सगेसोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. इतकंच नाही, तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

माझ्याविरोधात फडणवीस कटकास्थान रचत असून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आरोपानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. जालन्याच्या अंबडमध्ये मराठा आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसची जाळपोळ केली आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे अर्ध्या रस्त्यातूनच फिरले माघारी; मुंबईत न जाण्याचं सांगितलं कारण

त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. हीच बाब लक्षात घेता, एसटी महामंडळाने बीड जिल्ह्यातून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या सर्व बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या बस बंद करण्यात आल्याचं, बीड एसटी विभाग प्रमुख अजय मोरे यांनी सांगितले आ

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना वगळता जिल्हाभर आणि सर्व जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस सुरू राहणार, असं देखील मोरे यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

दुसरीकडे, मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे. मराठा आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply