Beed News : ओबीसींच्या उपोषणाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष, अनेक कुणबी नोदीं बोगस... बाळासाहेब सानप यांचे गंभीर आरोप

Beed News : 'एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांची रीघ लागत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जात आहे,' असा गंभीर आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कीर्तनवाडी येथे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही मागणी घेऊन ओबीसी बांधवांचे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या आमरण उपोषणाकडे प्रशासनातील अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुर्लक्ष आहे.

Pune News : खवले मांजर तस्करी पडली महागात; 7 जणांना वन कोठडी

एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांची रीघ लागत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे.

त्याचबरोबर "राज्यात ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये देखील बोगसपणा आढळून येत आहे, त्यामुळे याची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणत्या प्रवर्गात आहे? हे अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं," असं आव्हान सानप यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकीकडे म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला जाणार नाही, मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र दिले जातात. त्यामुळे हे सरकार केवळ दोन समाजात तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी बाळासाहेब सानप यांनी केला आहे. 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply