Beed News : माजलगावात गावठी पिस्टलसह तरुणास अटक; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Beed News : बीडच्या माजलगाव शहरात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी त्याच्याकडून ३१ हजाराचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माजलगाव शहरात सापळा रचून पिस्टल बाळगणारा इमरान जबी पठाण रा. माजलगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Amravati Crime News : 'तवा' बाबावर बलात्काराचा गुन्हा, मार्डीच्या आश्रमातील भयंकर प्रताप

गुन्हा दाखल करत तपास सुरु 

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरु करण्यात येत आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *