Beed : मराठा वि. ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल, बीडची निवडणूक जातियतेच अडकली

Beed Lok Sabha Election : बीड लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs Maratha) असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर राज्यामध्ये एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष अशी निवडणूक होत आहे, मात्र बीड याला अपवाद आहे. कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत यावेळी तर टोकाला पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसा प्रचाराचा जोरदेखील आता वाढू लागला आहे. मात्र बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीचा मुद्दाच पुढे येताना पाहायला मिळतोय. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आणखी वाढताना पाहायला मिळतोय. तर बीड जिल्ह्यात यापूर्वी जेवढे खासदार निवडून आले त्यांची जात कधीच काढली गेली नाही असं सांगताना धनंजय मुंडे यांनी खासदारांची यादीच वाचून दाखवली.आता आमची जात का काढली जाते असा सवाल उपस्थित केला

सध्याच्या परिस्थितीमुळे मन कलुषित होतंय

गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वी बीड लोकसभेचे प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर तब्बल दहा वर्ष पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेचा प्रतिनिधित्व केला. मात्र पहिल्यांदाच राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बघून मन कलुषित होतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटल आहे. वायरल कॉल आणि अफवा पसरवून कितीही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला तरी मी कॅलिबर सोडणार नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

Lok Sabha Election 2024 : मोदींच्या प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मनसेनं मारलं; ठाकरेंकडून इतर पर्यायांची चाचपणी

धनंजय मुंडेच जात फॅक्टर चालवतात

आता जाहीर भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत जात आल्याचे म्हटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांना प्रतिउत्तर दिलं. या निवडणुकीमध्ये आमच्यासाठी कोणतीही जात हा मुद्दा नाही तर आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत. उलट धनंजय मुंडेच निवडणुकीत जात फॅक्टर चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बीड जिल्ह्यातील जातीय मतांचा आकडा - एकूण मतदान 21 लाखाहून अधिक

मराठा - सात ते साडेसात लाख 

वंजारी - साडेचार ते पाच लाख 

दलित - दोन ते सव्वा दोन लाख 

मुस्लिम - सव्वा दोन ते अडीच लाख

ओबीसी - म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख

लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होणार

आता बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका.या निवडणुकात मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय ते निर्माण होताना पाहायला मिळतय. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र या वेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होतील असं काही ज्येष्ठ पत्रकारांना वाटत आहे.

बीडमध्ये जातीयता भडकावली जात असल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप

बीडमध्ये सध्या जातीच्या मुद्द्यावरून प्रचार सुरू असताना दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलन नसून मुद्दाम जातीयता निर्माण करण्यासाठी सुरू असलेला प्रायोजित कार्यक्रम आहे असा आरोप केला. बीड जिल्ह्यात यापूर्वी असं वातावरण निवडणुकीत कधीच पाहायला मिळालं नाही असं पंकजा मुंडे म्हणतायत. बीड जिल्ह्यामध्ये सध्याचे चित्र निर्माण झाला आहे त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याची खंत देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली

बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लावला जातोय असं अजिबात नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायम मराठा विरुद्ध वंजारी अशीच राहिलेली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये जाती जातीतील तेढ रस्त्यावर पाहायला मिळत आहे. पण हा जातीयवाद असाच फोफावत राहिला तर भविष्यातील राजकारणाविषयी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply