Beed Lok Sabha : बीडमध्ये मविआ उमेदवाराकडून बोगस मतदानाची तक्रार; फेर मतदान घेण्याची मागणी

Beed Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले. यात बीड लोकसभा मतदार संघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बोगस मतदान झाल्याची तक्रार करत काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. 

बीड लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघामध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याचे दिसत असून यानंतर आता  मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील दहा, केज  तालुक्यातील दोन, माजलगावमधील एक, धारुर मधील चार आणि आष्टी व पाटोद्यातील प्रत्येकी एका गावात इन कॅमेरा फेर मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. 

PM Narendra Modi : पाचव्या टप्प्यासाठी PM नरेंद्र मोदी सज्ज; मुंबईत रोड शो, कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा

मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप  

या गावांमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. तसेच धर्मापुरी या गावातील काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे देखील म्हटले असून आता या पत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply