Beed Crime News : ३० हजारात बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरच्या सहकाऱ्यांसह आवळल्या मुसक्या

Beed Crime News : एकेकाळी बेकायदा गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकारांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत होता. पण अलीकडे मात्र बीडमध्ये मुलींचा जन्मदर वाढला. परंतु यामध्ये काही बदल झालेला नाही. कारण असाच गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार पुन्हा समोर आलाय. बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात केला जात असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनानं छापा टाकून गेवराईतील या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश केलाय. ५ जानेवारीला पोलिसांनी ही कारवाई केली. डमी रुग्णाच्या साहाय्याने त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केलंय.

Amravati News : मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले; अमरावतीत वातावरण तापलं

कशी केली कारवाई :

बीडच्या गेवराईतील गर्भलिंग निदान  प्रकरणातील रेट कार्ड समोर आल्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी ही मोहिम राबविली आहे. डमी रुग्णाच्या साहाय्याने ते या बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रापर्यंत पोहोचले होते. यामध्ये एका तपासणीला २५ ते ४० हजार रुपये घेतले जात असल्याचं समोर  आलंय.

या रॅकेटमध्ये घरमालक चंद्रकांत चंदनशिव, डॉ. सतीश गवारे आणि मनिषा सानप नावाच्या महिलेचा समावेश आहे. यावेळी त्यांनी डमी रुग्णाकडूनही ३० हजार रुपये घेतले. ५ हजार रुपये घरमालक चंद्रकांत चंदनशिव, ११ हजार रुपये डॉ. सतीश गवारे, तर राहिलेले १४ हजार रुपये मनीषा सानप स्वत:कडे ठेवत होती, अशी माहिती मिळतेय. पोलिसांनी याप्रकरणी मनीषाचे वर्षभराचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. त्यातून अजून कोण कोण यांच्या संपर्कात होतं, याची माहिती मिळणार आहे. मनीषा नावाच्या महिलेचं गेवराई शहरातच ३ मजली घर आहे. पोलिसांनी कारवाईनंतर तिच्या घराची झडती घेतली होती. परंतु, त्यांना तेथून काही पुरावे मिळाले  नाही.

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा :

गर्भलिंग निदान करणं अवैध आहे. या कायद्यानुसार गरोदरपण आणि बाळंतपणाच्या आधी पोटातील बाळ मुलगा आहे की मुलगी, याची तपासणी करणं कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यानुसार गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply