Beed Bank Scam : 150 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला केली अटक

Beed News: बीड जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट बँकेच्या कोट्यावधीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बीड जिल्ह्यातील जवळपास १६०० ठेवीदारांचे १५० कोटी रूपये या बँकेत अडकले आहेत.

याप्रकरणी बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिता बबन शिंदे यांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या पतसंस्थेच्या अध्यक्षांना पोलिसांनी अटक केल्याने ठेवीदारांच्या ठेवींचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या प्रकरणी १९ जून रोजी ग्राहकांनी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याची दखल पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे ग्राहकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी याप्रकरणी माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळांवर बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सात दिवसांनंतर म्हणजे आज अनिता बबन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

Rain Updates : उत्तर भारतात पावसाचं थैमान; विविध घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

लोकांना जास्त व्याजदराचे प्रलोभन दाखवून माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या होत्या. बँकेच्या अध्यक्षांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला.

ज्यावेळेस ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळेस बँकेकडे ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यास पैसेच नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असे बँकेकडून सांगण्यात येत होते. पण तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बँकेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी सुनील वांढरे आणि बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणात आज पोलिसांनी पहिली अटक केली आहे. बँकेच्या अध्यक्षांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply