Beed APMC Election Result : बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरंकडून काकांना धोबीपछाड; 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय

Beed APMC Election Result: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल समोर आले असून बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दणदणीत पराभव केला आहे. निवडणूकीत 18 पैकी 15 जागेवर आमदार संदीप क्षिरसागर पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिता अशी की, बीड  कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. ज्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी  काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात कडवे आव्हान दिले होते. हाती आलेल्या निकालानुसार 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय मिळवत बीड बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकवला आहे.

या निकालाने काकाने पुतण्याला धोबीपछाड केल्याचे बोलले जात असून हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागील 35 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती.

दरम्यान, या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली आहे. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते.

बारामतीत राष्ट्रवादी पुन्हा...

बारामती बाजार समितीचेही निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकहाती विजय मिळवत गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ उमेदवार निवडून आणत भाजपचा सुपडा साफ केला आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply