Beed News: आंदोलनकर्त्याचा टोकाचा निर्णय, पोलिसांवर गंभीर आरोप; मंत्री पंकजा मुंडेंचंही नाव घेतलं

Beed : बीडमध्ये ३ गायरान धारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घडली. या गायरान धारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे देखील नाव घेतलं आहे. सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात विष प्राशन केलल्या गायरान धारकांवर उपचार सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. यासोबत त्यांनी बीडमधील अनेक नेत्यांची नावं घेत गंभीर आरोप केले आहेत. मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा लक्ष देत नसल्याचा आरोप या गायरानधारकांनी केला. पोलिसांकडूनच आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ज्या पोलिसांवर गंभीर आरोप झाले त्यानी बोलण्यास नकार दिला.

Raigad : धक्कादायक! आजारपणाला कंटाळली, आजीने नातवासोबत टेरेसवरून उडी मारली, रायगड हादरले

बीड जिल्ह्यातील जवळगाव येथे गायरान धारकांनी तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. २५ वर्षापासून गायरान कसं उपजीविका भागवत असल्याने या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प करण्यास या गायरान धारकाकडून विरोध करण्यात येत असतानाच आज बर्दापूर येथील पोलिसांचा बंदोबस्त लावून गायरान धारकांना बेदखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तीन गायरान धारकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply