Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; धनजंय देशमुख यांच्याकडून न्यायाची लढाई सुरू, घेणार मोठा निर्णय


Beed : संतोष देशमुख प्रकरणात नवीन अपडेट हाती येत आहे. दोन्ही प्रकरणावरून आरोपींचे निकटवर्तीय आणि मृत संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय यांनी वाल्मिक कराडला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता धनंजय देशमुख मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दोषारोप पत्र पाहून पुन्हा सीआयडी आणि एसआयटीची भेट घेणार आहे. त्यानंतर मोठा निर्णय घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना धनंजय देशमुख म्हणाले, 'एका निष्पाप माणसाला यांनी संपवलं. ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवसापासून खरी न्यायाची लढाई सुरू झाली. घटना जरी वेगवेगळ्या असल्या, तरी याच मूळ एकच म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे. हे सर्व एकच आहेत, यांचं मोठं जाळ आहे. यांना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच असणार आहे. जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत'.

KDMC News : अनधिकृत बांधकाम प्रश्नी केडीएमसी ॲक्शन मोडवर; निर्माणातील इमारतीवर तोडक कारवाई

'संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीच्या तपासाबाबत विचारणा केली गेली. आयडिया एसआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती केली होती की तपास पक्षपातीपणे झाला पाहिजे. या आरोपींना फाशी झाली पाहिजे. दोषारोप पत्र पाहून पुन्हा सीआयडी आणि एसआयटीची भेट घेणार आहे. अतिशय संयमाने आणि संवेदनशील मार्गाने जायची वेळ येईल. त्या मार्गाने जायची तयारी ठेवणार आहोत. वकिलांची भेट घेऊन सविस्तरपणे माहिती घेऊन पुढे प्रकरण कसे चालवायचे आहे, या संदर्भात देखील विचारणा करणार आहोत, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

'लढ्यामध्ये सुरुवातीपासून मनोजदादा यांनी एफआयआर नोंदवण्यासाठी सांगितला. तोपर्यंत कोणी एफआयआर देखील घेतला नाही. लोकप्रतिनिधी गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी गावकरी देखील पाठीमागे उभे राहिले. गावकऱ्यांना सोबत घेऊन येथून पुढचा लढा लढला जाणार आहे. आमचं गरीब कुटुंब आणि एकोपाने राहणारं आमचं गाव आहे, असे देखील धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply