Beed : एसटी चालकाचा लेक झाला सरकारी अधिकारी! MPSC त झेंडा रोवला, अख्ख्या बीडमध्ये होतेय कौतुक

Beed : सरकारी अधिकारी होण्याची अनेकांची इच्छा असते. प्रशासकीय सेवेत काम करुन काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांचे असते. यासाठी अनेक गावाखेड्यातील मुले एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये फार कमी लोकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. परंतु कितीही अपयश आले तरीही पुन्हा प्रयत्न करणारा व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच यश बीडच्या आष्टी तालुकांना तरुणांना मिळालं आहे. तालुक्यातून ७ जणांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्यातील एक मुलगा एसटी चालकाचा लेक आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले आहे. या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय. विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एमपीएससीतून महसूल सहायक पदी निवड झाली आहे.

Pune News : पुण्यातील बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, आर्थिक व्यवहारावर निर्बंध, हजारो लोकांना फटका

पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहेत. मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. ग्रामीण भागातील नितीन गर्जे याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक पदी गवसणी घातली आहे. गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा करण्यात आला.

आपल्या मुलाने काहीतरी करावं, खूप मोठं व्हावं, असं प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात. त्यासाठी मुलं दिवसरात्र मेहनत करुन अभ्यास करतात. एसटी चालकाच्या मुलाचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने खूप मेहनत करुन हे यश मिळवलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply