Beed : परळी हादरली, पुतण्याने चुलतीचा घेतला जीव, कुऱ्हाडीने डोक्यावर अन् अंगावर सपासप वार

Nephew kills aunt Parli Beed : बीडमधील परळी खूनाच्या घटनेने पुन्हा हादरली आहे. दारूसाठी पैसे देत नसल्यामुळे पुतण्याने चुलतीचा जीव घेतलाय. पुतण्याने रागाच्या भरात घरातील कुऱ्हाडीने चुलतीचा जीव घेतला. डोक्यावर आणि अंगावर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्याने चुलतीची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावर पळ काढला. कावळ्याची वाडी येथे ही घटना घडली आहे. परिमाला बाबुराव कावळे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव चंद्रकांत कावळे असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे २५ वर्षीय पुतण्याने ६५ वर्षीय चुलतीचा जीव घेतला. पुतण्याने चुलतीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. आरोपी दारूडा पुतण्या चंद्रकांत धुराजी कावळे (वय 25 वर्ष) याने ६५ वर्षीय परिमाला बाबुराव कावळे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर परळीमधील कावळ्याचीवाडीत एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत कावळे दारू पिण्यासाठी चुलतीकडे दररोज पैशाची मागणी करत होता. परिमाला कावळे या पुतण्याला कधी कधी पैसे द्यायच्या. पण चंद्रकांत दररोज पैशासाठी तगादा लावायचा, त्रास द्यायचा. यावरून वाद झाला, त्यातूनच हत्याची घटना घडली.

गुरूवारी सायंकाळी सहा वाजता आरोपीने परिमाला यांच्याकडे पैशांची मागणी केली. परिमाला यांच्याकडे पैसे नव्हते. तिने पैसे देण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपी चंद्रकात याला राग अनावर आला. रागाच्या भरात चंद्रकांतने घरातील कुऱ्हाडीने चुलतीच्या अंगावर आणि डोक्यावर सपासप वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पुतण्याच्या हल्ल्यात चुलतीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.मयत महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी पुतण्याचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply