Barsu Refinery Protest : मोठी बातमी! बारसूत आंदोलन चिघळलं, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; दोन जण जखमी

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद आता चांगलाच चिघळला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. यामध्ये दोन आंदोलन जखमी झल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं. हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी गावकरी विरोध करत आहेत. आंदोलनस्थळावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.  

पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती आहे.

तत्पूर्वी, या आंदोलक ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खासदार विनायक राऊत आज शिवसेना कार्यकर्त्यांसोबत बारसू प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांच्या भेटीसाठी आले होते.

यावेळी सुरुवातीला पोलिसांनी  विनायक राऊत यांचा ताफा अडवला. त्यानंतर विनायक राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बारसू ठिय्या आंदोलन केले होते.

त्यानंतर पोलिसांनी विनायक राऊत यांच्याशी चर्चा करुन त्यांची एकच गाडी बारसू ग्रामस्थांचे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पाठवली. पण आंदोलन ठिकाणी पोहचलेल्या विनायक राऊतांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस परीस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply