Barsu Refinery Project : आंदोलनस्थळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने आग! पोलिसांकडून आटोक्यात

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून सध्या जोरदार विरोध होताना दिसत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी गावकरी विरोध करत आहेत.

दरम्यान, आंदोलनस्थळावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलक गोंधळ करत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही आहे. पोलिसांनी पुढे जाणाऱ्या आंदोलकांना अडवलं.

माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या या आंदोलकांचा रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आहे. आंदोलकांना मागे फिरवण्याचं काम सुरू आहे. बऱ्यापैकी आंदोलक आता मागे फिरत असल्याची माहिती हाती येत आहे. दरम्यान, या सगळ्यात आंदोलनस्थळी आग लागल्याचीही घटना घडलेली आहे. मात्र यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, पोलिसांनी त्वरित ही आग विझवल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply