Barsu Refienry Protest : 'बारसू'बाबतची उद्धव ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड : उद्योगमंत्री उदय सामंत

Uday Samant : ज्यांना बारसू प्रकल्पाला विराेध करायचा आहे. ज्यांना सर्वेक्षण थांबवायचे आहे त्यांनी प्रसारमाध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करावी, जनतेपुढे त्यांनी हा उद्याेग आम्ही घालवत आहाेत अशी त्यांची भूमिका सांगितल्यास सर्व काही स्पष्ट हाेईल असे मत उद्याेगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पाच्या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बाेलताना सांगितले. दरम्यान सामंत यांनी सध्या या प्रकल्पाविषयी ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड झाल्याचेही स्पष्ट केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर सुरु झाल्याचे दिसून आला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधी यांना देखील आंदाेलनस्थळावरुन पाेलिसांनी हटकले. त्याचे पडसाद राज्यभरातून उमटले. आमदार नाना पटाेले, खासदार संजय राऊत,शेतक-यांचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दांत बारसूतील पाेलिसांच्या आणि सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

उदय सामंत म्हणाले बारसू येथील आंदाेलकांना काहींनी उलट सूलट प्रश्न विचारले गेले. त्यामुळे कायदा व सुवव्यवस्था बिघडू नये यासाठी पाेलिसांनी काही माध्यम प्रतिनिधींना हटविले असले. हा क्रांतीकारी प्रकल्प आहे. प्रशासनाला स्थानिकांना माध्यमांना घेऊनच हा प्रकल्प पुर्णत्वास आणायचा आहे.

उद्धव ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड : उदय सामंत

उद्धव ठाकरे गटाकडून तसेच काही लाेकांकडून जाणिवपुर्वक या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरविले जात आहे. बारसूत प्रकल्प व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रास पत्र लिहिले हाेते. आता तेथील आमदार रिफायनरी झाली पाहिजे असे म्हणतात, खासदार राऊत म्हणतात नाही व्हायला पाहिजे, खासदार विनायक राऊत म्हणतात वेळ पडली तर उद्धव ठाकरे तेथे येतील.

सर्वांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. काहींना राजकारण करायचे हाेते. त्यांचे मनसुभे धुळीला मिळाली. त्यामुळेच सकाळपासून बाेंबाबाेंब सुरु आहे असेही सामंत यांनी स्पष्ट केलेय



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply