
Baramati : बारामती शहर पोलीस ठाण्यातच राडा झाल्याचे समोर आले आहे. आमराईत झालेली भांडणे फिर्यादी पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ आरोपीही धावत आले. त्यानंत पोलीस ठाण्यातच पुन्हा दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलीस ठाण्यातील आरसा फोडला. या घटनेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्याचा देखील गुन्हा दाखल केला आहे. या व्यतिरिक्त मारहाणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी जगताप, विकास जगताप, गणेश पाठक, ओम जगताप, तनू जगताप, अजय नागे, अनिता दिनेश जगताप (सर्व रा. आमराई, बारामती) आणि अन्य सात ते आठ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी देखील घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
|
Pune News : गाव वसले पण गावपण हरवले, पुण्यातील माळीणवासीयांचा जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले... |
शहर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. बंटी जगताप हा जखमी अवस्थेत शहर पोलीस ठाण्यात आला होता. त्याच्यासोबत अनिता दिनेश जगताप आणि अन्य पाच जण आले होते. पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी दिल्यानंतर तेवढ्यात धीरज पडकर हा तेथे आला. त्याला बंटी जगताप आणि इतरांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने तेथीलच पोलीस ठाण्यातील आरसा फोडून त्या आरशाची काच धीरजच्या पोटात घालण्यासाठी पुढे आणली. त्यास पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे गौरव दिलीप जगतापने दिलेल्या फिर्यादीवरून, धीरज पडकर, सचिन पडकर, प्रेम रणपिसे या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव हा सोमवारी मध्यरात्री घरी असताना धीरजने फोन करून गौरवला परिसरात नेले. तु माझ्या पत्नीला काय बोलला, अशी विचारणा करत त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सचिन राजेंद्र पडकर (रा. भोईटे हॉस्पिटलशेजारी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. बंटी जगताप याच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यात आलो असता गेटवरच दहा ते बारा जण थांबले होते. पोलीस ठाण्यातच मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरुन बंटी जगताप, विकी जगताप, बबलू जगताप, अनिता जगताप, गणेश पाठक, अजय उर्फ गोट्या नागे, गौरव भंडारे व इतर सात ते आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


