DHFL Bank Scam Case : DHFL घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; वाधवान बंधूंची ७०.३९ कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Bank Scam Case : DHFL घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीने वाधवान बंधूंची तब्बल ७०.३९ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवन आणि धीरज वाधवन हे सध्या तुरुंगात आहेत. 

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी डीएचएफएल कंपनीचे संचालक वाधवान बंधूंवर आहे. या घोटाळ्याची रक्कम ही ४२ हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितलं जातंय. यापैकी ३४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा वाधवान बंधूंनी केल्याचे समजतंय. ईडीकडून या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.

Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातील नामांकित शाळेच्या संचालकाला अटक

दरम्यान, ईडीने गुरुवारी रात्री धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची ७०.३९ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये २८.५८ कोटींचे संलग्न मालमत्ता, ५ कोटींचे घड्याळे, १०.७१ कोटींचे हिरेजडित दागिने, ९ कोटींचे हेलिकॉप्टरमधील २० टक्के स्टेक आणि १७.१० कोटी रुपयांच्या वांद्रे येथील दोन फ्लॅट्स समावेश आहे.

दरम्यान, वाधवान बंधू सध्या कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, के.ई.एम आणि जे. जे. रुग्णालयाच्या आवारात त्यांचे खासगी व्यक्तींसोबत भेटीगाठीचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती.

DHFL घोटाळा प्रकरण काय आहे?

कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी सरकारचे अनुदान लाटल्याचा आरोप केला जात आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक DHFL ची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून १४ हजा ४६ कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली, असा आरोपी सीबीआयने केला आहे.

ज्यांच्या नावाने ही खाती काढण्यात आली होती. त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं, असंही सीबीआयने म्हटलं आहे. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply