Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचा नोकरभरतीसाठी कँडल मार्च

पुणे - उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आवश्यक अधिकारी, लिपिकांची भरती करावी. तसेच, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कँडल मार्च काढला.

युनायटेड फोरम फॉर महाबँक युनियनच्या वतीने शिवाजीनगर पोलिस मैदानाजवळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय कार्यालय ते मुख्य कार्यालयाजवळील एकबोटे कॉलनीतील पोस्ट ऑफिसपर्यंत हा कँडल मार्च निघाला. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना आदी कर्मचारी संघटना यात सहभागी झाल्या.

संघटनांचे प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, अनंत सावंत, राजीव ताम्हाणे, बी. कृष्णा, संतोष गदादे, विराज टिकेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निघालेल्या या कँडल मार्चद्वारे लवकर नोकरभरती करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply