Bangladesh Clashes : भाषण सुरू होण्याआधी बांगलादेशात वडिलांचं स्मारक जाळलं; संतापलेल्या शेख हसीना यांनी भारतातून दिला इशारा

Bangladesh Clashes : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे बुधवारी ऑनलाईन भाषण होते. भारतामधून त्यांचे भाषण सुरू होणार होते पण तिकडे बांगलादेशमध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाका येथील निवासस्थानाची आणि स्मारकाची तोडफोड केली आणि पेटवून दिले. शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान बांगलादेशच्या धनमंडी ३२ येथे आहे. संतप्त झालेल्या जमावाने बुधवारी संध्याकाळी शेख हसीना यांचे ऑनलाईन भाषण सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या वडिलांच्या घरावर हल्ला केला. या जमावाने शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बंदी घालण्याची मागणी केली.

बुधवारी रात्री ९ वाजता शेख हसीना भाषण देणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर बांगलादेशमधील शेख हसीना यांच्याविरोधातील गट आक्रमक झाला. या गटाने शेख हसीनांच्या भाषणाविरुद्ध सोशल मीडियावर 'बुलडोझर रॅली'चे आवाहन करण्यात आले. यानंतर संध्याकाळपासूनच राजधानीतील धनमोंडी भागात असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या घरासमोर हजारो नागरिक जमले होते. हसीना यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच या संतप्त जमाव शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाचा गेट तोडून घरात घुसले. त्यांनी घराची तोडफोड करत जाळपोळ केली. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pimpri Chinchwad : दारू पिण्यासाठी पैसे हिसकावत केली हत्या; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी शेख मुजीबुर रहमान यांचे निधन झाले होते. १९७५ मध्ये त्यांची हत्या झाली होती. नंतर ढाका येथील त्यांचे निवासस्थान स्मारक संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले होते. शेख हसीना यांचे भाषण छात्र लीगने आयोजित केले होते. जे आता अवामी लीगचे विसर्जित विद्यार्थी संघ आहे. माजी पंतप्रधानांना त्यांच्या भाषणापूर्वीच त्यांच्या वडिलांच्या घरी जाळपोळ आणि तोडफोडीची माहिती मिळाली. त्या खूपच संतप्त झाल्या. त्यांनी थेट युनूस सरकारला इशारा दिला. त्या म्हणाल्या की, 'मी तुमच्यासाठी काही केले नाही का?' मी काम केले नाही का? मग माझ्या वडिलांनी स्वातंत्र्याचा नारा दिलेल्या घराची तोडफोड का करण्यात आली? मला न्याय हवा आहे.'

शेख हसीना यांनी आपल्या भाषणात देशवासीयांना सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित प्रतिकार करण्याचे आवाहन केले. बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांच्या सरकारचा इशारा देत शेख हसीना म्हणाल्या की, 'त्यांच्यात अजूनही ऐवढी ताकद नाही की ते लाखो शहीदांच्या जीवाच्या किंमतीवर मिळवलेले राष्ट्रध्वज, संविधान आणि स्वातंत्र्य बुलडोझरने उद्ध्वस्त करू शकेल. ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास नाही.' त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, 'इतिहास त्याचा सूड घेतो.'

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply