Bangalore News : पान खाण्याचा मोह जिवावर बेतला; 'स्मोकी पान' खाल्ल्याने १२ वर्षाच्या मुलीच्या पोटात झालं छिद्र

Bangalore News : हौस मजेसाठी अनेकजण पान खात असतात, पण मजेसाठी आणि स्वाद घेण्यासाठी पान खाणं एका मुलीच्या अंगाशी आलंय. तु्म्ही पानातील स्मोकी पान खाण्याचे शौकीन असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आह. कारण स्मोकी पान खाल्ल्याने एक १२ वर्षाच्या मुलीच्या पोटात छिद्र झाल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडलीय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंगळुरूमधील अनन्या नावाच्या मुलीला (नाव बदलण्यात आले आहे) स्मोकी पान खाल्ल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी अचानक पोटदुखी सुरू झाली. त्यानंतर लगेचच त्याचे कुटुंबीय तिला रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी तिच्या पोटात छिद्र असल्याचे सांगितले. यानंतर अनन्याला सांगितलं की, तिने फक्त स्मोकी पान खाल्लं. इतर लोकांनीही ते पान खाल्लं पण त्यांना कोणताच त्रास झाला नसल्याचं तिने सांगितले.

Gujarat News : एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

दरम्यान रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एचएसआर लेआउटवर असलेल्या नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अनन्याला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. अनन्याला इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीसह एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी करावी लागली. ऑपरेशन सर्जन डॉ विजय एचएस म्हणाले, “इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे, यात शस्त्रक्रियेत पोटाची तपासणी करण्यासाठी लवचिक ट्यूब वापरली जाते.

या ट्यूबने अन्ननलिका तपासली जाते. यातून डॉक्टरांना समजलं की, अनन्याच्या पोटाच्या ४बाय ५ सेंटिमीटरचा एक भाग काढून टाकण्यात आला. दरम्यान शस्त्रक्रियेनंतर ६ दिवसांनी अनन्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नारायण रुग्णालयानुसार,नायट्रोजन गॅसच्या बंद जागेत जलद बाष्पीभवनामुळे खूप दबाव निर्माण होत असतो. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तसेच स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. "द्रव नायट्रोजनचा धूर शरिरात घेतल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो"



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply