
Bangalore : हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज (ता. ३) सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद (JDS) कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात हकालपट्टीचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रज्वल यांचे वडील आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा तसेच प्रज्वल रेवण्णा यांना आता अटकेची भीती आहे. त्यामुळे अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते.
या प्रकरणामुळे निवडणुकीच्या राजकारणावरील संभाव्य परिणाम विचारात घेऊन प्रज्वल यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शिमोग्यामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी करण्यात येईल. ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कोण कुठे आणि कधी जाणार, याची वाट पाहत बसायचे का? असा प्रश्न त्यांनी केला.
|
|
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धजदचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी नातू प्रज्वल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, हासनमधील अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह रस्त्यावर सापडला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देवेगौडा यांच्या कुटुंबीयांनाही मान खाली घालावी लागणारी ही घटना आहे. तसेच धजद आमदारांनी स्वतः प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करावी, त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
निवडणुकीवर परिणाम होणार
लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Assault Case) आरोपांबाबत पीडित महिलेने रविवारी होळेनरसिंपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेवण्णाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल, अशी भीती भाजप-धजद युतीच्या नेत्यांना वाटत आहे. या प्रकरणामुळे धजदमध्येही तणाव निर्माण झाला असून, गुरुमितकलचे धजदचे आमदार शरणगौडा कुंडकूर हे या प्रकरणामुळे खजिल झाले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान आणि धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टीची मागणी केली आहे.
भाजप नेत्यांनी अंतर राखले
भाजपनेही या प्रकरणाचा बचाव केलेला नाही. कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. कायद्यासमोर कोणीही मोठे नाही. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल. दोषींना शिक्षा व्हावी, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले. तर माजी मंत्री सी. टी. रवी म्हणाले की, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. एसआयटीच्या तपासातून सत्य बाहेर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले आहे.
प्रज्वल यांना परदेशातून आणले जाईल
बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले, एसआयटी टीम या खटल्याच्या संदर्भात पेन ड्राईव्हसह सर्व साक्षीदार तपासत आहेत. गरज भासल्यास प्रज्वल रेवण्णाला जर्मनीतून परत आणले जाईल. एसआयटी अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ एफएसएलकडे पाठवण्यात येणार आहेत.
चौकशीसाठी येऊ
एच. डी. रेवण्णा यांनी आपल्यावरचे आणि मुलगा प्रज्वल यांच्यावरचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. सरकारला याची चौकशी करू द्या. कायद्यानुसार काय ते होऊ द्या, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, आपला मुलगा प्रज्वल पळून गेलेला नाही. चौकशीसाठी बोलावले तर मी येईन. चौकशी करून कायदेशीर कारवाई करा. प्रज्वलला जर्मनीत जायचे होते. बोलावले तर तो येईल.
कारवाई निश्चित करू : डॉ. परमेश्वर
‘प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल. लैंगिक हिंसाचारातील पीडित महिला घाबरल्या असतील, तर सरकार त्यांना सुरक्षा पुरविल. आम्ही या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. तपास पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


