IPL 2024 RCB vs LSG : तेजतर्रार मयंकची वेगवान गोलंदाजीत ‘यादवी’ ; बंगळूरच्या फलंदाजांना दणका,लखनौचा शानदार विजय

Bangalore: डी कॉक याची धडाकेबाज ८१ धावांची खेळी... निकोलस पूरनच्या आक्रमक नाबाद ४० धावा... अन्‌ युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव (३/१४) याचा आणखी एक भन्नाट स्पेल याच जोरावर लखनौ संघाने आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत बंगळूर संघावर २८ धावांनी मात केली. लखनौचा हा दुसरा विजय ठरला. यजमान बंगळूर संघाला मात्र घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. हा त्यांचा मोसमातील तिसरा पराभव ठरला.

लखनौकडून बंगळूरसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मयंक यादवसह इतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्प्यातील गोलंदाजीसमोर बंगळूरच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. विराट कोहली व फाफ ड्युप्लेसी या जोडीने ४० धावांची भागीदारी करताना सुरुवात छान केली; पण सिद्धार्थच्या गोलंदाजीवर विराट २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्युप्लेसी १९ धावांवर धावचीत झाला. मयंक यादवच्या जबरदस्त गोलंदाजीपुढे बंगळूरचे फलंदाज अपयशी ठरले. लोमरोर याने ३३ धावांची खेळी केली. त्याला काही यश मिळाले नाही.

IPL 2024 Rishabh Pant : पंतसाठी अविस्मरणीय खेळी ; दिल्ली कॅपिटल संघाचे संचालक गांगुलींकडून कौतुक

बंगळूरचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, याआधी बंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटॉन डी कॉक व के. एल. राहुल या जोडीने आक्रमक सुरुवात करताना ५२ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर राहुल मयंक डागरकरवी २० धावांवर झेलबाद झाला. डी कॉकने मात्र आपला झंझावाती खेळ कायम ठेवला. त्याने ५६ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी साकारताना ८ चौकार व ५ षटकारांचा पाऊस पाडला. निकोलस पूरनने अवघ्या २१ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावांची फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक ः लखनौ २० षटकांत ५ बाद १८१ धावा (क्विंटॉन डी कॉक ८१, निकोलस पूरन नाबाद ४०, ग्लेन मॅक्सवेल २/२३) विजयी वि. बंगळूर सर्व बाद १५३ धावा (विराट कोहली २२, रजत पाटीदार २९, महिपाल लोमरोर ३३, मयंक यादव ३/१४, नवीन हक २/२५).

मयंकचा प्रभावी मारा

पंजाबविरुद्धच्या लढतीत २७ धावा देत तीन फलंदाज बाद करीत सामन्याला कलाटणी देणारा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव बंगळूरविरुद्धच्या लढतीतही चमकला. त्याने १४ धावांत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एवढेच नव्हे, तर मयंक सातत्याने १५० किलोमीटर ताशी वेगाने चेंडू टाकत होता, हे विशेष. आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने मॅक्सवेलला (०) पूरनकरवी झेलबाद केले. यानंतर नऊ धावांवर खेळत असलेल्या कॅमेरुन ग्रीनचा त्रिफळा उडवला. या चेंडूच्या वेगापुढे ग्रीन निष्प्रभ ठरला. पुन्हा आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने रजत पाटीदार याला २९ धावांवर बाद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply