Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणात ही पहिली अटकची कारवाई आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, वरिष्ठ विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
अरुणकुमार मोहंता, मोहम्मद अमीर खान आणि पप्पू कुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही कर्मचारी बालासोर जिल्ह्यात तैनात आहेत. आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुराव्याशी छेडछाड करत असल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले.अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता बाहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसने स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसही त्याच्या कचाट्यात आली. या भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1000 हून अधिक जण जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास 6 जूनला सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या समितीला अपघाताचे मुख्य कारण 'चुकीचे सिग्नलिंग' असल्याचे आढळून आले आहे.
कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीने (CRS) रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहानगा बाजार येथील स्टेशन मॅनेजरने S&T कर्मचार्यांना दोन समांतर ट्रॅक जोडणार्या स्विचच्या कामात अडथळे येत असल्याचे सांगितले असते तर दुरुस्ती करण्यात आली असती. नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर जिल्ह्यातील बहानगा मार्केट आणि त्याच्या आसपासच्या गावांच्या विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

