Balasaheb Thorat: मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप

Balasaheb Thorat: राज्याच्या राजकारणातून सध्या मोठी बातमी समोर येत असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू होते.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता वाढदिवसा दिनीच बाळासाहेब थोरातांनी मोठा धक्का दिला आहे.

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन सुरू झाला होता वाद...

बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.

"विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे," अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा दिल्याने कॉंग्रेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *