Balasaheb Thorat : 'जे झालं ते व्यथित करणारं होतं, मी अन् पक्ष बघून घेऊ', थोरात स्पष्टच बोलले

नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. या सर्व घडामोडी घडत असताना सत्यजित तांबे यांचे मामा म्हणजेच काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याने ते या सर्व घडामोडींपासून लांब होते.

या सर्व घडामोडी त्याचबरोबर घडल्यानंतर आणि अपक्ष म्हणून आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर आरोप प्रत्यारोप केले. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर आज त्यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं त्यावेळी पासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे उद्योग व्यवसाय बंद पाडले जात आहेत. आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू. त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं तरीदेखील सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला असं तर म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना थोरात म्हणाले की, राजकारण झालं ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीतील माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर बोललं पाहिजे असं नाही या मताचा मी आहे. म्हणून याबाबत मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य त्या प्रकारे निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही.

विधानपरिषदेच राजकारण सुरू असताना अनेक बातम्या आल्या. भारतीय जनता पक्षपर्यंत आपल्याला पोहचवल. इतकच नाही तर भाजपच्या तिकिटाचे वाटपही त्यांनी केलं आहे. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ही काम मुद्दाम करतात. अशा पद्धतीच्या चर्चा ते घडवून आणतात. तरीदेखील काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि त्याच विचारान आम्ही पुढे देखील चालू. आतापर्यंत याच विचाराने जात आहोत. पुढे देखील याच विचाराने चालू असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

तर पुढे म्हणाले कि, मी काँग्रेसच्या विचाराने आतापर्यंत चाललो पुढेही याच काँग्रेसच्या विचाराने चालेल आणि याची ग्वाही मी देतो पुढच्या काळात यांच्यासोबत असेच उभे रहा असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply