
Balasaheb Thackeray Death Anniversary : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरीलस्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या राड्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ज्या बेईमान लोकांनी काल स्मृतीस्थळी नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं? असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे. गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर, 2024 ला पिक्चर दाखवणार असे संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या समाजकारणातलं महान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर मुंबई मराठी माणूस स्वाभिमानाने ताठ मान करून असलेला माणूस आपल्याला दिसला नसता. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र अखंड ठेवला आहे. आमच्यासारखे असंख्य लोक जे समाजकारणामध्ये काम त्यांच्यामुळे करत आहेत. आम्ही दिल्लीत गेलो, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेमुळे आहे.
|
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्याची पदयात्रा! |
पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसला?
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो शिवसैनिक कसला? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं. पण काल स्मृतीस्थळावर ज्यांनी नोटंकी केली त्यांना शिवसैनिक आम्ही कधीच मानणार नाही. त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी अजिबात श्रद्धा नाही. संत तुकडोजी महाराजांच एक अभंग आहे. मनी नाही भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही. तुमच्या मनात श्रद्धा नाही भाव नाही आणि तुम्ही स्मृती स्थळावर येऊन नौटंकी करत आहे.
मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत बसले तोपर्यंत बीजेपीचे पोपट
तुमच्या मनामध्ये बाळासाहेबांबद्दल भाव नाही आणि स्मृतिस्थळावर येऊन नौटंकी करता. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्यांना जर विरोध केला असेल तर महाराष्ट्राला तो मान्य नाही. कुणी काहीही म्हणू दे काल जो प्रकार घडला निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला हा कालचा ट्रेलर आहे आणि 2024 ची तयारी आहे .काल जे आले होते त्यातील अर्ध्या लोकांनी आधीच दहा पक्ष सोडले होते. ते कधी राम बनले ते बिभीषण बनले आहेत. बिभीषण आपल्या स्वार्थासाठी जेव्हा आला होता तेव्हा प्रभुरामाने त्याचा वापर केलाय नंतर त्यांना सोडून दिले त्यांना काय माहित राम काय आहे. या लोकांना अयोध्या आम्ही पहिल्यांदा दाखविली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते आयोध्येत गेले. आता मुख्यमंत्रीपदावर जोपर्यंत बसले आहेत तोपर्यंत बीजेपीचे पोपट म्हणून बोलत राहतील, असे संजय राऊत म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


